ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध् व्हाव्यात व शिक्षणाच्या बाबतीमध्ये ते कोठेही मागे पडू नयेत, त्यांना उच्च् शिक्षण मिळावे, तसेच त्यांच्या जीवनामध्ये कोणतयाही प्रकारच्या अडचणी व संकटांचा सामना करण्याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावा व महाविद्यालयातील विद्यार्थी हे सर्वगुण संपन्न् व गुणवत्तापुर्ण शिक्षण घेवून बाहेर पडावेत व या माध्यमातून स्वावलंबी शिक्षणाचा हेतू साध्य् व्हावा, यासाठी श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार माननीय भानुदास मुरकुटे साहेब यांनी अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना केली व या संस्थेच्या माध्यमातून तयांनी कला, वाणिज्य्, व विज्ञान महाविद्यालयाची मुहूर्तमेूढ रोवली. मान. भानुदास मुरकुटे साहेबांनी अगदी थोडक्या विद्यार्थी संख्येवर अशोक कारखाना परिसरात हे महाविद्यालय सुरू केले. खूप छोटेसे रोपटं लावलेलं होतं; परंतु आज आपण पहातोय की या रोपटयाचा खूप मोठया वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. अशोकनगर परिसरासारख्या या ग्रामीण भागामध्ये या ज्ञानमंदिराची स्थापना झाली व एक हक्काचे शैक्षणिक संकुल तयार झाले व या संकुलामधून अनेक विद्यार्थी हे साहित्यिक, लेखक कलाकार अभिनेते, पुढारी, खेळाडू तयार होताना आपण पाहत आहोत. विद्यार्थ्यांच्या सुप्त् कला गुणांना वाव देण्याचा प्रयत्न या विशेषांकामधून केला जातो. एक हक्काचे व्यासपीठ विद्यार्थ्यांना दिले जाते. लेखक कवी, साहित्यिक यांच्या लेखनीला व त्यांच्या उत्कृष्ट् प्रतिभेला फुलविण्याचा प्रयत्न् या माध्यमातून होतो. साहित्य् व संस्कृती जपण्याचा व शैक्षणिक विचारांची प्रगल्भता या ‘स्वप्नपूर्ती’ या विशेषांकामधून मोठया प्रमाणात फुलत जाईल हा आम्हा सर्वाचा मानस आहे. महाविद्यालयाचा परिसर हा खूप प्रसन्न् आहे. सुसज्ज् इमारत, अद्यायावत ग्रंथालय, बॉटनीकल गार्डनृ गृहविज्ञान विभाग, सुसज्ज् प्रयागशाळा, मल्टीजीम, बॅडमिंटन हॉल, टेबल टेनिस हॉल, खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, क्रिकेट ग्राऊंड, ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थींनीसाठी बसेसची सुविधा असे विविधतेने नटलेले ग्रामीण भागातील आनंददायी वातावरण असलेले हे महाविद्यालय आहे.
             त्याचप्रमाणे अनुभवी प्राध्यापाक वृंद आहे. परिक्षा विभागाचे काम अतिशय पारदर्शी आहे. व परिक्षा कॉपीमुक्त् घेतल्या जातात. उत्कृष्ट् निकालाची परंपरा महाविद्यालयाने कायम ठेवली आहे. महाविद्यालयामध्ये विद्यापीठअंतर्गत विविध प्रकारचे उपक्रम घेतले जातात. त्याचप्रमाणे दरवर्षी विद्यापीठस्तरीय कै. भास्करराव गलांडे पाटील वक्तृत्व् स्पर्धेचे आयोजन केले जाते. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे १५० स्वयंसेवकांचे युनिट या ठिकाणी कार्यरत आहे. विद्यार्थी विकास मंडळ, बहिषाल शिक्षण मंडळ, सॉफ्टस्किल डेवलपमेंट प्रोग्राम, प्राध्यापक प्रबोधिनी, सावित्रीबाई फुले विकास मंच, स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र, वार्षिक स्नेहसंमेलन, विविध प्रकारच्या क्रिडा स्पर्धा, असे विविध उपक्रम मा. प्राचार्य डॉ. समीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व सहकारी प्राध्यापक कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीपणे राबविले जातात. हे सर्व उपक्रम व महाविद्यालयाची उत्तुंग यशाची भरारी व शैक्षणिक प्रगतीचा उंचावत जाणारा आलेख म्हणजे संस्थेचे संस्थापक माजी आमदार मा. मुरकुटे साहेब यांची प्रेरणा, मार्गदर्शन, निटनिटके नियोजन, समजून घेण्याचे धाडस, काम करून घेण्याची हातोटी होय. व त्यांच्या बरोबरच त्यांचे सर्व सहकारी, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रावसाहेब थोरात, उपाध्यक्ष मा. दिगंबर शिंदे, संस्थेचे सचिव मा. श्री. भास्कर खंडागळे, मुळाप्रवरा संचालक मा. सिध्दार्थ मुरकुटे, सहसचिव आबासाहेब गवारे, कारखान्याचे चेअरमन मा. दिगंबर शिंदे, व्हा, चेअरमन मा. बापुराव त्रिभुवन, मा. सौ मंजुश्री मुरकूटे, समन्वयक, अशोक ग्रामीण शिक्षण संस्था तसेच कारखान्याचे सर्वच पदाधिकारी, सर्व संचालक, व सर्व कर्मचारी या सर्वांचे महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये व प्रगतीमध्ये मोलाचे सहकार्य मिळते. त्याचप्रमाणे सर्व संपादक मंडळ सर्व विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, सर्व प्रशासकीय कर्मचारी, मुद्रक किर्ती ऑफसेट या सर्वांच्या एकत्रित परिश्रमाने व सहकार्याने सर्व काही व्यवस्थित चालले आहे. सर्वांना मनापासुन धन्यवाद देते.
मा.प्रा.सौ.सुनिता मिलिंद गायकवाड